रेसिपी शोधा

पालक पनीर - Palak Paneer




पालक – १ जुडी ( 500 ग्राम )
पनीर – 300 ग्राम
तेल – २- 4 चमचे
हींग – १- २चिमुट
जीरा – लहान चमचा
हल्दी पाउडर – १/४ लहान चमचा
टोमॅटो – २- ३
हिरवी मिरची – २
आले
लसणाच्या पाकळ्या – ७-८
बेसन – २ लहान चमचे
मलाई – २ चमचे
लाल तिखट – १/४ लहान चमचा
नमक – स्वादानुसार (एक छोटी चम्मच)
गरम मसाला – १/४ लहान चमचा

कृती -
१)पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या एका भांड्यात पाणी उकळत ठेवा व त्यात पालकाची पाने 5-6 मिनिटं शिजू द्या
२) पनीरचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या. व तेलात तळून घ्या
3) शिजवलेला पालक मिक्सरमधे बारीक करा व बाजूला काढून घ्या नंतर
टोमॅटो, हिरवीमिरची, आले व लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्या
४) कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यात जिरं ,हिंग , हळद आणि बेसन घालून धोडस परतून घ्या आता त्यामध्ये टोमॅटो, हिरवीमिरची, आले व लसणाची पेस्ट घाला व परतून घ्या २ चमचे मलाई टाका तेल सुटेपर्यंत परतावे
५) नंतर त्यात बारीक केलेला पालक घाला आवश्यकतेनुसार पाणी व मीठ टाका, एक उकळी येऊ द्या
उकल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घाला व भाजी 2-3 मिनिटे शिजू द्या थोडा गरम मसाला घाला नंतर गॅस बंद करा
टीप – आपण पनीर तेलात तळून किंवा न तळतही भाजीमध्ये टाकू शकतो

हरभरा डाळीची आमटी - Aamti

साहित्य – अर्धी वाटी हरभरा डाळी
एक मोठा कांदा
अर्धी वाटी खोबरं किस
धने -एक चमचा
मीठ -चवी नुसार
लाल तिखट
हिंग -1/4 चमचा

बेसन भेंडी - Besan Bhendi

साहित्य -  Ingredients
  • भेंडी  – एक पाव  250 ग्राम/ 250 grams okra
  • तेल – 3 चमचे/ 3 tbsp oil
  • हींग – 1/4 लहान चमचा/  1/4 tsp Asafoetida
  • जीरा – 1/4 लहान चमचा/ 1/4 tsp cumin seeds
  • हळद  – 1/4 लहान चमचा/ 1/4 tsp turmeric powder
  • हिरवी मिरची -2 (उभ्या कापलेल्या )/Green chillies - 2(cut into 2 long halves)
  • बेसन पीठ  – 1 टेबल स्पून/ 1 tbsp gram flour
  • धने पावडर  – 1 लहान चमचा/ 1 tsp coriander powder
  • बडीशेप पाउडर – 1 लहान चमचा/ 1 tsp fennel Seed Powder 
  • मीठ   – चवीनुसार/ salt as required
  • लाल तिखट  – 1/4  लहान चमचा/ 1/4 tsp red chilli powder
  • गरम मसाला – 1/4 छोटी चम्मच/ 1/4 tsp garam masala powder
  • कोथिंबीर/ few chopped coriander leaves
कृती –
1)भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. भेंडीची देठ कापून भेंडीला उभे चिरून दोन भाग करा
2) कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग , हळद ,  हिरवी मिरची,  धने पावडर, बडीशेप पाउडर टाका  नंतर बेसन पीठ टाकून  थोडासा  लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या
3) परतलेल्या मसाल्यात भेंडी टाका , मीठ , लाल तिखट आणि गरम मसाला टाकून भेंडी चांगली ढवळून  घ्या. म्हणजे भेंडीला मसाला लागेल .
4) भेंडी झाकून  ठेवून  गॅस मंद आचेवर करून शिजवून घ्या. मधून मधून भाजी हलक्या हाताने ढवळून घ्या
5) भेंडी शिजली की त्यात वरुन कोथिंबीर घाला आणि गरम गरम बेसन भेंडी पोळीसोबत   सर्व्ह करा

बेसन लाडू रेसिपी - Besan Ladoo


NEW BOLLYWOOD MOVIE


साहित्य:

  • बेसण – 250 ग्राम (2 कप)
  • तूप  -200 ग्राम (1 कप)
  • साखर  – 250 ग्राम 1 1/2 कप)
  • इलाइची — 8-10
  • काजू – 50 ग्राम (1/4 कप) एक


कृती:

एका जड बुडाच्या कढईत तूप गरम करून घ्या
त्यात बेसन घालून माध्यम आचेवर बेसन  ब्राऊन रंग येपर्‍यात भाजून घ्या गाठी होऊ देऊ नका . भाजताना बेसन सतत ढवळत रहा कारण बेसन कढईच्या बुडाशी लागून करपणार नाही  बेसन  भाजल्यावर  भांडे खाली उतरवा. हे बेसन गार होण्यासाठी ठेऊन द्या. बेसन थोडे कोमट झाले की त्यात साखर, विलायची  पूड घालून नीट एकत्र करा. हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर एका ताटात चांगले मळुन घ्या. . त्यात कापलेले बदाम, काजू , बेदाणे घाला आणि त्याचे लाडू वळावेत. साधारणपणे ह्याचे १५-२० लाडू होतील. हे लाडू थोडावेळ तसेच उघडे ठेवावे म्हणजे ते कोरडे होतील. एकदा का लाडू कोरडे झाले की ते हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू १५-२० दिवस चांगले राहतील.

ढोकला रेसिपी - Dhokla

साहित्य -  Ingredients
1 कप बेसन पीठ / 1 cup Gram flour
1/2 कप  दही / 1/2 cup Curd (yogurt)
2 चमचे रवा / 2 tablespoon Semolina
1 चमचा साखर / 1 tablespoon Sugar
1 छोटा चमचा हळद /1 teaspoon Turmeric powder
१/२ चमचा आले पेस्ट / 1 teaspoon crushed Ginger paste
१/२ चमचा हिरवि मिरची पेस्ट/ 1 teaspoon crushed Green Chilli paste
१ चमचा तेल / 1 teaspoon Oil
चवीनुसार मीठ / Salt Add to taste(1 tsp)
इनो / 1 tsp Eno salt

फोडणी साठीचे साहित्य / For Tempering:
2 चमचा तेल / 2 tablespoons Oil
1 लहान चमच मोहरी/ 1 teaspoon Mustard Seeds
१/२ लहान चमचा हिंग / 1 pinch Asafoetida
2 हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या )/2 Green Chillies, slit lengthwise and cut into halves
कोथिंबीर/Coriander Leaves

कृती -
1) एका भांड्यात  १ कप बेसन पिठ घ्या  त्यात २ चमचे रवा ,1/2 कप दही 1/4 कप पाणी टाका   चांगले मिसळून घ्या व हे मिश्रण चार तास बाजूला ठेवा.
2) चार तासानंतर वरील मिश्रणामध्ये  1 चमचा साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, , १ चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे.
3) नंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाका त्यामध्ये बाउल ठेवा व त्या बाउल मध्येही पाणी  टाका   पाणी गरम होण्यासाठी (उकळी येणेसाठी ) कुकर गॅसवर ठेवा ,
4) एका पसरट भांडे घ्या ज्यात आपण वरील मिश्रण टाकणार आहोत , त्या भांड्याला आतून तेल लाऊन घ्या जेणेकरून मिश्रण भांड्याला चिकटणार नाही ,
5) वरील मिश्रणात इनो घालून पटापट  अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते.व फुगून दुप्पट होईल  लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून कुकरमध्ये वर   ठेवावे व कुकरचे झाकण लाऊन घ्यावे कुकरला शिट्टी लाऊ नये , 15-20 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यावा
6)जोवर ढोकळा  तयार होतो तोवर फोडणी करून घ्यावी. एका कढईत २ चमचे तेल गरम करावे. 1 लहान चमच मोहरी,  १/२ लहान चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या ) परतून घ्याव्या त्यात 1 कप पाणी घाला व उकळी येऊ द्या
7)15-20 मिनिटाने  गॅस बंद करावा , 2-3 मिनीटणे कुकरमधील भांडे बाहेर काढावे, ढोकला थोडा थंड होऊ द्यावा नंतर चाकूने त्याचे काप करून घ्यावे,  एका ताटात ढोकळयाचे काप काढून घ्यावे ( ताटात ढोकळयाचे भांडे उलटे करून )त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करावा

मसाला भात - Masala Bhat


तांदूळ - 200 ग्रॅम / 2 Wati
लिंबू -1
रिफाइन्ड तेल
एक चमचे जीरे 
लवंगा - 3-4 टुकड़ांमधे तोडलेल्या 
वेलची - 1-2 सोलन बिया काढून टाका
लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
कोबी - 50 ग्रॅम बारीक कापून
गाजर - २ बारीक कापून
वटाना - एक वाटी सोललेली
टोमाटो - एक बारीक चिरलेला 
कोथिम्बीर - अर्धे प्याला बारीक कपलेली 
मीठ - चवीनुसार

कृति -
  • कुकरमध्ये  तेल टाकून बारीक चिरलेला कांदा थोडा लालसर होई पर्यन परतून घ्या
  • नंतर आल लसुणाची पेस्ट टाका
  • वाटणा सुद्धा तेलात परतून घ्या जेणेकरून तो लवकर सिजेल
  • शेंगदाने , तेजपान , धनिया पावडर , जिरे , हळद आणि लाल मिरची पावडर टाकून जरा परता
  • बारीक कापलीली टोमाटो त्यात सोडा . व वटाना, कोबी, गाजर टाका 
  • नंतर पाणी सोडून एके उकडी येउ द्या .
  • मग त्यात धुतलेले तांदूळ टाका आणि  जरा ढवळून घ्या, आता त्यात कोथिम्बीर टाका 
  • चवीपुरते मीठ टाकून कुकर बंद करा आणि मध्यम आचेवर ३ - ४ सिटी होईपर्यंत शिजू द्या.
गरमा गरम सर्वे करा .

रसगुल्ला रेसिपी - Rasgulla

साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता )
300 ग्राम साखर
2 लिंबाचा रस

कृती –

  • एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका  आणि दुध हलवत रहा  जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल  तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा  ,  ह्या  फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्या
  • तयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने  एकजीव  होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  • नंतर  एका पातेल्यात साखर व  4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्या
  • तयार झालेले रसगुल्ले पाकासहित   एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.

साबुदाणा वडा - Shabudana Wada

साबुदाणा वडा - Shabudana Wada


साबुदाणा  – 1 कप
बटाटे   -  2 मोठ्या आकाराचे
शेंगदाण्याचा कूट  -  आधा कप
हिरव्या मिरच्या – ४ -५
जिरं
मीठ – चवीनुसार
तेल

कृती – 1) साबुदाणा पाण्यात ४-५  तास भिजत ठेवा( माऊ होई पर्यंत ) जास्तीचे पाणी  काढून घ्या
2) बटाटे उकडून घ्या . थंड झाल्यानंतर कुस्करून घ्या.
3) शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर बारीक करून घ्या
४) हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या
५) भिजवलेला  साबुदाणा, कुस्करून घेतलेले बटाटे , शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचे वाटण, जिरं आणि
चवीपुरते  मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या.
6) मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या आणि दोन्ही हाताने चपटे करा
7)  कढईमध्ये तेल गरम घ्या ,  मध्यम आचेवर वडे ब्राऊन रंग होईस्तोवर तळून घ्या .

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म