साहित्य:
- बेसण – 250 ग्राम (2 कप)
- तूप -200 ग्राम (1 कप)
- साखर – 250 ग्राम 1 1/2 कप)
- इलाइची — 8-10
- काजू – 50 ग्राम (1/4 कप) एक
कृती:
एका जड बुडाच्या कढईत तूप गरम करून घ्या
त्यात बेसन घालून माध्यम आचेवर बेसन ब्राऊन रंग येपर्यात भाजून घ्या गाठी होऊ देऊ नका . भाजताना बेसन सतत ढवळत रहा कारण बेसन कढईच्या बुडाशी लागून करपणार नाही बेसन भाजल्यावर भांडे खाली उतरवा. हे बेसन गार होण्यासाठी ठेऊन द्या. बेसन थोडे कोमट झाले की त्यात साखर, विलायची पूड घालून नीट एकत्र करा. हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर एका ताटात चांगले मळुन घ्या. . त्यात कापलेले बदाम, काजू , बेदाणे घाला आणि त्याचे लाडू वळावेत. साधारणपणे ह्याचे १५-२० लाडू होतील. हे लाडू थोडावेळ तसेच उघडे ठेवावे म्हणजे ते कोरडे होतील. एकदा का लाडू कोरडे झाले की ते हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू १५-२० दिवस चांगले राहतील.