साबुदाणा – 1 कप
बटाटे - 2 मोठ्या आकाराचे
शेंगदाण्याचा कूट - आधा कप
हिरव्या मिरच्या – ४ -५
जिरं
मीठ – चवीनुसार
तेल
कृती – 1) साबुदाणा पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा( माऊ होई पर्यंत ) जास्तीचे पाणी काढून घ्या
2) बटाटे उकडून घ्या . थंड झाल्यानंतर कुस्करून घ्या.
3) शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर बारीक करून घ्या
४) हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या
५) भिजवलेला साबुदाणा, कुस्करून घेतलेले बटाटे , शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचे वाटण, जिरं आणि
चवीपुरते मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या.
6) मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या आणि दोन्ही हाताने चपटे करा
7) कढईमध्ये तेल गरम घ्या , मध्यम आचेवर वडे ब्राऊन रंग होईस्तोवर तळून घ्या .