साहित्य :
- दूध - ३ लिटर
- काजू - ५० ग्राम (बारीक तुकडे केलेले )
- साखर - ३०० ग्राम
- निंबू रस - २ छोटे चमचे
- वेलची पावडर - २ छोटे चमचे (५ ते ६ वेलची बारीक कुटलेली)
- तूप - १ छोटा चमचा
कृती :
- सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात दूध आटवायला ठेवा व मधून मधून हलवीत रहा . दूध जवळ जवळ १/४ राहील एवढे आटऊन घट्ट करा .
- आता त्यात निंबू रस टाकून आणखी थोड्या वेळ हलवीत घट्ट करा.
- दूध चांगले घट्ट झालेकी त्यात साखर टाकून मिक्स करा व दूध चांगले जमेल असे होईपर्यंत आणखी शिजवा . मिश्रण चांगले हलवीत रहा जेणेकरून ते खाली पातेल्याला लागू नये .
- आता त्यात वेलची पावडर आणि काजूचे तुकडे टाका एकदम मंद आचेवर थोड्यावेळ शिजवा .
- दरम्यान एका छोटया पातेल्याला आतून तूप लावा .
- आता तयार मिश्रण पातेल्यात टाका व चांगले भरून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा .
- आता पातेल्याच्या कडा चाकूच्या मदतीने मोकळ्या करा व पातेलं प्लेटमध्ये पालटे करून हाताने थोडी थाप देऊन केक मोकळा करा .
- तुमचा मिल्क केक तयार आहे. आता त्याचे हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा .