चोकलेट सामोसा - chocolate samosa
साहित्य :
साहित्य :
- दीड कप मैदा
- २ ते ३ टीस्पून बारीक कुटलेली साखर
- २ टीस्पून तूप
- १ कप बारीक किसलेले चोकलेट
- १ टेबलस्पून पिस्ता (कापून बारीक केलेले )
- तेल सामोसे तळन्याकरिता
थोडा पाक बनविण्याकरिता :
- ८ टीस्पून बारीक केलेली साखर
- १ चूप पाणी
कृती :
- सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घ्या त्यात साखर आणि तूप टाकून पाणी टाकीत एक घट्ट गोळा तयार करा व थोड्या वेळ बाजूला ठेवा .
- एका भांड्यात चोकलेट घ्या त्यात पिस्ता आणि थोडी साखर टाका व चांगले मिक्स करून बाजूला ठेवा
- आता तयार कणकीचा गोळा घ्या व त्याचे हव्या त्या आकाराचे तुकडे करा व त्याची पोळी लाटायला घ्या . तयार पोळीचे मधनं दोन भाग करा व एका भागाला हातात घेऊन तिच्या कडांना थोडे पाणी लावीत दोन्ही कडा जोडा व कोण तयार करा.
- आता त्यात थोडे चोकलेट चे मिश्रण भरा मिश्रण भरून दुसरी बाजू हलक्या बोटांनी बंद करा .
- एका भांड्यात ८ टीस्पून साखर घ्या व त्यात जवळ जवळ १ कप पाणी टाकून मिश्रण तयार करा .
- आत्ता एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा , तेल गरम झाले कि तयार सामोसे हलके तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या .
- तयार सामोसे साखरेच्या मिश्रणात टाका व चांगले मिक्स करून एका प्लेट मध्ये काढा .
- तुमचे चोकलेट सामोसे तयार आहेत . तुम्ही हे केव्हाही चहासोबतसर्व करू शकता .